आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस वितरण संपन्न:श्रीरामपूर शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेत दिल्लीचा एम्स संघ ठरला विजेता

श्रीरामपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसेवा विकास आघाडी आयोजित लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे चषक अखिल भारतीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगरपरिषदेच्या मिनी स्टेडियमवर आयोजित केलेल्या सदर स्पर्धेत दिल्लीचा एम्स् संघ विजेता तर जामनेर संघ उपविजेता ठरला. तर आय.एस.सी. मालेगाव (तृतीय), इस्तियाक मालेगाव (चतुर्थ), युथ फौंडेशन मणेराजूरी (पाचवा), खुर्शिद मालेगाव (सहावा), अमीर माळशीरस (सातवा), तर सेक्रेटरी सेव्हन महाराष्ट्र (आठवा) या संघांनी बक्षिसे मिळविली.

माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या पुढाकाराने व्हॉलीबॉल स्पर्धांचे प्रथमच आयोजन केले. या स्पर्धेत दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश यासह महाराष्ट्रातील नामांकित एकूण ४२ संघ सहभागी झाले. उत्कृष्ट नियोजन, चुरशीचे सामने, अटीतटीचे झालेले सेमी फायनल व फायनलचे सामने यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. सदर स्पर्धेत बेस्ट शूटर इस्तियाक (मालेगाव), बेस्ट लिफ्टर जाहिद (मालेगाव), बेस्ट पंचर विकास (एम्स दिल्ली) तर एम्स दिल्ली संघाचा मित्तल नागर हा शहर पोलीस स्टेशन पुरस्कृत सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

या स्पर्धेला माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. सुजय विखे, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार लहू कानडे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे, पृथ्वीराज राजेंद्र नागवडे, फकिरा लोढा, सलीम बागवान, मधुकर राळेभात, बाबासाहेब कोते, युवराज तनपुरे, आप्पासाहेब कोहोकडे, राजेंद्र चव्हाण, प्रशांत वाबळे, जलिल पठाण, रमेश कडपे, सतिष वैजापूर, दिलीप खरात, बाळासाहेब भांड, महेश माळवे, राजेंद्र बोरसे, अनिल पांडे, नवनाथ कुताळ, करण नवले, मनोज आगे, रवी भागवत, प्रदीप आहेर, जयेश सावंत, गणेश अंबिलवादे, अस्लम बिनसाद आदींनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...