आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीगोंदे तालुक्यातील अजनुज परिसरातील भीमानदी पात्रात अवैध वाळूचोरी विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूचोरांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या कारवाईत १ जेसीबी ताब्यात घेतला असून ३ जेसीबी २ ट्रक पळून नेले. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अजनुज परिसरातील भीमा नदीपात्रात २१ जून रोजी अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी मंडळ अधिकारी डहाळे आणि कामगार तलाठी बळी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावर मंडळ अधिकारी आणि कामगार तलाठी यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी भीमा नदी पात्रात छापा टाकला. त्या ठिकाणी ४ जेसीबी आणि २ ट्रकच्या सहाय्याने वाळूउपसा आणि वाहतूक सुरू होती. कारवाई करत असताना सर्व वाहने पळवून नेत असताना महसूल पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही ट्रकचालकांनी ट्रक महसूल पथकावर घालण्याचा प्रयत्न करत वाहने पळवून नेली.
या कारवाईत महसूल पथकाने १ जेसीबी ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणून जमा केला, तर ३ जेसीबी, २ ट्रक पळून नेले. दलित वस्तीतून भरधाव वेगाने वाळू माफियांचा जेसीबी जात असताना रस्त्यावर १० ते १५ मुले खेळत होती. सुदैवाने मुले बाजूला झाली. त्यातील ग्रामपंचायत सदस्य नाना पवार यांची तीन वर्षांची मुलगी तसीच रस्त्यावर खेळत राहिली. ग्रामपंचायत सदस्य पती नाना पवार यांनी ही बाब पहिली. प्रसंगावधान राखून त्यांनी आपल्या मुलीला उचलून बाजूला ओढले. याबाबत ग्रामपंचायत सदस्य पती नाना पवार यांनी तहसीलदार मिलिंद कुलथे यांना २१ रोजी अवैध वाळूउपसा बंद करण्यासंबंधी निवेदन दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.