आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक आमदाराला सांगताहेत तुला मंत्रिपद देतो:अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले - पराभवाच्या भीतीने निवडणुका घेत नाही

अहमदनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार टिकावे म्हणून शिंदे-फडणवीस सरकार प्रत्येक आमदाराला सांगताय तुला मंत्रिपद देता, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. पराभवाच्या भीतीने शिंदे- भाजप निवडणुका जाहीर करत नाही असा आरोपही अजित पवारांनी केला आहे.

अजित पवार म्हणाले की, 28 वर्षे आमदार निवडून येणाऱ्या कसब्यात हरले तरी भाजपकडून जोमाने येणार अशी भाषा सुरू आहे. आम्ही देखील येणारी निवडणूक ही डबल जोमानेच लढणार आहोत. मविआ एकत्र निवडणूक लढवेल असे सांगतानाच ज्या पक्षाची मतदारसंघात ताकद असेल तो मतदारसंघ त्या पक्षाला देऊन मविआतील मित्र पक्षांनी त्यासाठी काम करायला हवे. तर दुसरीकडे मविआच्या वरीष्ठ पातळीवर जागावाटपाचे सूत्र ठरेल ज्या पक्षाला जी जागा सुटेल त्यासाठी सर्वांनी काम करायला हवे तरच कसब्या सारखा निकाल मिळेल असेही पवारांनी म्हटले आहे. आम्हाला उमेदवारी नाही दिली आम्ही का काम करावे असे कुणी करू नये अशा सूचनाच अजित पवारांनी पाथर्डीमध्ये मविआच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत. मात्र आम्ही चिंचवडसाठी देखील खूप प्रयत्न केले. मात्र तिथे आमचा पराभव झाल्याची खंतही यावेळी त्यांनी उपस्थित केली.

अजित पवार यापुढे बोलताना म्हणाले की, आता जर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर जे आहे ते सर्व आमदार सोडून जातील, प्रत्येक आमदाराला की तुला मंत्री करतो म्हणत शिंदे - फडणवीस हे केवळ सरकार टिकवण्याचे काम करत आहे, असा घणाघात अजित पवारांनी केला आहेे. एका मंत्र्यांकडे 6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद असल्याचे या सरकारमध्ये दिसून येत आहे. आम्ही आणलेेले कारखाने परराज्यात जात आहे, तिकडे कुणाचे लक्ष नाही असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, वर्षांवर चहाचा खर्च दोन कोटी रुपये होतो कसा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय वर्षांवर सोन्याचा चहा देता का असा सवाल उपस्थित केला. तर मविआच्या काळातील कामांना स्थगिती देणे हा रडीचा डाव असल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...