आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:उगाचच रोहितला त्रास होईल म्हणून गप्प बसतोय...भरसभेत अजित पवार संतापले

जामखेड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सभेत सारखे प्रश्न विचारणाऱ्याला उपमुख्यमंत्री म्हणाले, "तुला लईच कळतंय रं'

आपल्या सडेतोड, बेधडक बोलण्याच्या विशिष्ट ‘स्टाइल’मुळे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत. याचे प्रत्यंतर शनिवारी पुन्हा एका एकदा जामखेड येथील सभेत आले. जामखेडमध्ये शनिवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत पवार बोलत होते. या वेळी उपस्थित जनसमुदायातून एक जण उठून “वीज नाही, शेतमालाला भाव नाही,’ अशी सारखी प्रश्नांची सरबती करत होता. त्यावर उपमुख्यमंत्री पवार त्याच्यावर चांगलेच संतापून म्हणाले, असा प्रकार बारामतीत झाला असता तर याला सांगितले असते जाऊ दे, याचा त्रास रोहित पवारला होईल म्हणून गप्प बसतो, अशा शब्दांत सुनावले.

नंतरच सगळेच झाले शांत : जामखेड येथे शनिवारी भूमिपूजन कार्यक्रमानंतर बाजार तळावर सभा झाली. त्या वेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. पवार यांचे भाषण सुरू असताना, उपस्थित जनसमुदायातून एक जण उठून उभा राहिला. वीज मिळत नाही, शेतमालाला भाव द्या, अशी मागणी करत होता. त्याच्याकडे प्रथम पवार यांनी दुर्लक्ष केले. पण अखेर ते संतापले व म्हणाले, ‘तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत असे कोणी मध्ये बोलत नाही. उगीच रोहितला त्रास होईल म्हणून गप्प बसतोय.’ यानंतर सर्वच शांत झाले.

बातम्या आणखी आहेत...