आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मवीरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशातच "अरे तुम्हाला जनाची नाही तर मनाची आहे का ? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी चंद्रकांत पाटलांना केला.
पाटील यांनी तुम्ही देणगी देऊन, श्रमदान करून, लोकवर्गणी करून म्हटले असते तर आम्ही समजू शकलो असतो. पणं तुम्ही भीक मागण्याची उपमा देताहेत. सहा महिने झाले खरंतर या मंत्र्यांना आवरलं पाहिजे. अशा रोखठोक शब्दात सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. अहमदनगर येथे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे तीन दिवसापासून सुरू असलेले उपोषण विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले पवार?
अजित पवार म्हणाले, जी लोक आपल्या गाड्या फोडतायहेत, घोड्या फोडताहेत, बसेस फोडतायेत, मराठी माणसांवर अन्याय करताहेत, त्यांच्याच कर्नाटक बँकेला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. 7 डिसेंबरचा हा जीआर आहे. ही कुठली पद्धत आहे. तुम्ही आरेला कारे केलं पाहिजे. जशास तसे उत्तर दिले पाहिजे.
सरकार आल्यापासून काहीजण वाचाळवीर झालेत
सरकार आल्यापासून काहीजण वाचाळवीर झालेत, तुम्ही मंत्री महाराष्ट्रातले प्रश्न सोडवायला झालात की अशा प्रकारचे वक्तव्य करायला झालात ? असा सवाल पवार यांनी करून महापुरुषाबद्दल निषेधार्य वक्तव्य तुम्ही करत आहात. कर्नाटकाचा प्रश्न सुटावा यासाठी अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत. असे देखील अजित पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.