आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्घाटन:आकाश उद्योग समूहाच्या ई-जोश स्कूटरचे लाँचिंग आणि आयटी सेंटरचे उद्घाटन, ई-जोश बाईक विश्वास संपादन करत देशपातळीवर लैकिक मिळवेल  : जगताप

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकाश उद्योग समूह नगरमध्येच ई बाईकची निर्मित करत असल्याचा आनंद आहे. श्रीकृष्ण जोशी यांनी कष्टाच्या जोरावर परिश्रम करत मोठी प्रगती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या ई जोश या इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून नगरचे नावलौकिक नक्कीच वाढणार आहे, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी केले.

नगरच्या आकाश प्रिसिजन कॉम्पोननट्स कंपनीने तयार केलेल्या अत्याधुनिक ई जोश या इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग व आकाश आयटी सेंटरचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर समारंभात झाले. ई जोश या इलेक्ट्रिक स्कूटरचे लॉंचिंग आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. आकाश आयटी सेंटरचे उद्घाटन एल.अँड टी. कंपनीचे सिनीअर जनरल मॅनेजर महेश चांडक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण जगताप होते. यावेळी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, उद्योजक राजेंद्र अग्रवाल, चंदन पटारे, अरुण फडके, छत्रपती बजाजचे संचालक अलोक मित्तल, यमाहा शोरूमचे संचालक राजेश बन्सल, पवन अग्रवाल, विलास घोडके आदी उपस्थित होते. आकाश ग्रूप इंडस्ट्रीजचे चेअरमन श्रीकृष्ण जोशी, डायरेक्टर आकाश जोशी व ओंकार जोशी, अंकिता जोशी, सुप्रिया जोशी यांनी स्वागत केले. पुण्याचे आनंद कुटुंबीय संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. आकाश ग्रूप इंडस्ट्रीजचे चेअरमन श्रीकृष्ण जोशी म्हणाले, नगरमध्ये १९९८ साली लावलेले आकाश इलेक्ट्रिकल कंपनीचे छोटेसे रोपटे आता बहरत आहे. स्वतःचे उत्पादन सुरू करत भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, तलीळनाडू या पाच राज्यात कंपन्या सुरू करण्याचे भाग्य मला मिळाले. काळानुसार बदल करत ई स्कूटर व आयटी पार्क या नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. यावेळी ओंकार जोशी, सुजित विधाते यांनी यांनी मनोगत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...