आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवकाळी पाऊस:अकोल्यात आवकाळी पावसाने लावली हजेरी

अकोले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील विविध गावातून सोमवारी सायंकाळनंतर साधारण ६.४५ वाजल्यापासून बिगरमोसमी आवकाळी पावसाने हजेरी लावली. साडेसहा वाजल्यपासून सुरूवात टपोरे थेंबाने झाली. मात्र तद्नंतर संततधार पाऊस सुरू झाला.

सात वाजल्यापासून पावसाने तीव्र स्वरूप धारण केले. काही वेळातच सोसाट्याचा वारा सोबत घेऊन पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक व शेतातून काम करून घरी परतणाऱ्या बाईमाणसांची मोठीच तारांबळ उडाली. अकोले शहरासह धुमाळवाडी, नवलेवाडी, आंबड, आगार, ढोकरी, उंचखडक, परखतपूर, सुगाव, वाशेरे, औरंगपूर या गावात पावसाने हजेरी लावली.

बातम्या आणखी आहेत...