आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा:उक्कडगावचा अक्षय महाडिक झाला पोलिस उपनिरीक्षक

श्रीगोंदे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उक्कडगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सुपुत्र अक्षय महादेव महाडिक याची राज्य उत्पादन शुल्क विभागात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा क्रमांक मिळवून पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने उक्कडगाव ग्रामस्थ व मित्रपरिवाराने त्याची मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला.

अक्षयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगाव येथे झाले. सातवी मध्ये असताना राज्याच्या गुणवत्ता यादीत तो चमकला होता. हे करण्यासाठी त्याला त्याचे गुरू प्रवीण ठुबे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांचा आदर्श समोर ठेवून त्याला प्रेरणा मिळाली आणि अक्षयने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

आई वडीलांच्या कष्टाची जाण ठेवल्याने अक्षयची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली. ओबीसी प्रवर्गातून ग्रामीण भागातील उक्कडगाव सारख्या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील तरुण पोलिस उपनिरीक्षक झाल्याने गावाने पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. अक्षयच्या या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी चे नेते घनश्याम शेलार,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, युवाउद्योजक सचीन कातोरे, बारामती चे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, यांच्यासह उक्कडगाव चे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

जिद्द आणि चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही
आई वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून लागेल ती मदत केल्याने आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. गुरुजन प्रवीण ठुबे व शिंदे मॅडम, केशव कातोरे यांनी विशेष मार्गदर्शन केल्याने माझे स्वप्न साकार करण्यास मदत झाली. जिद्द आणि मेहनतीच्या,चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही.''-अक्षय महाडिक,पोलिस उपनिरिक्षक

बातम्या आणखी आहेत...