आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:सर्व उमेदवारांनी खर्चाचे विवरणपत्र सादर करावे

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणी होऊन निकाल जाहीर झालेला आहे. निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे विवरणपत्र ३० दिवसाच्या आत दाखल करावे. तसेच उमेदवारांनी खर्चाची माहिती ऑनलाईन भरावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सर्व उमेदवारांनी एकत्रित खर्चाचे विवरणपत्र मुदतीत १९ जानेवारी २०२३ पूर्वी सादर करावेत. जे उमेदवार विहित कालमर्यादेत निवडणूक खर्च सादर करणार नाहीत, त्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात येईल. त्यामुळे ज्या उमेदवारांनी खर्च सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी खर्च सादर करावा, असा इशारा नगर तहसीलदारांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...