आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोग निदान:ज्येष्ठ नागरिक व रिक्षा चालकांसाठी सर्व रोग निदान

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून व कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून हजारो लोकांचे प्राण वाचवणारे व सेवा देणारे दीसाल्वेशन आर्मी इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्या वतीने बूथ हॉस्पिटल मध्ये ज्येष्ठ नागरिक व रिक्षा चालकांसाठी सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.

यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडाच्या विविध तपासण्या, दंत तपासणी, स्त्रीरोग निदान व उपचार, तसेच बाळ रोग तज्ञ मार्फत लहान बाळाचे व नवजात शिशुच्या आजाराविषयी निदान व सल्ला तसेच शस्त्रक्रिया व पुढील उपचार योजने अंतर्गतकरुन मोफत औषधे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...