आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे तालुक्यातील १८ डिसेंबर रोजी होत आसलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्यासह जिल्हातील सर्वपक्षीय नेत्याचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व आसावे आणि यावरच पुढील निवडणुकीतील बेरीज वजाबाकी अंलबुन असते.
यासाठी कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी घडपड करीत आहेत. तालुक्यात १३ पैकी चिंचबन, खुपटी, सुरेनगर, शिरेगाव व हिंगोणी या पाच ग्रामपंचायतीचे सरपंच आमदार गडाख गटाचे निवडुन आले आहेत. कांगोणी वगळता भाजपाचे कुठेही आस्तित्व दिसत नसून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते संख्येने कमी असले तरी मोठ्या प्रमाणात परीश्रम घेत आहेत. तर भेंडा येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणूक जिंकणेसाठी लढत आहेत. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.