आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांगीण विकास:शेतकऱ्यांचा सोसायटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करू ; शेतकरी पॅनलने लढवली निवडणूक

पाथर्डी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या मढी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत तालुक्याच्या राजकीय जाणकारांचे लक्ष होते. मढी सेवा संस्थेची निवडणूक भगवान मरकड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने ही निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात माजी सरपंच देविदास मरकड व सरपंच संजय बाजीराव मरकड यांच्या नेतृत्वाखाली सद्गुरू कानिफनाथ शेतकरी विकास मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले. मढी गावच्या शेतकऱ्यांचा सोसायटीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करू, असे आश्वासन माजी सरपंच भगवान मरकड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले. निवडणूक निकाल जाहीर होताच ढोल ताशे गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विजयी उमेदवार असे भगवान सुर्यभान मरकड, दादासाहेब शिवराम मरकड, भाऊसाहेब जनार्धन मरकड, म्हातारदेव गोपीनाथ मरकड, विष्णू शिवराम मरकड, विष्णू रामभाऊ मरकड, सुखदेव धोंडीराम मरकड, साहेबा अश्रू आरोळे, लता संजय मरकड, विजया राधाकिसन मरकड, अशोक रंगनाथ मरकड, शंकर नामदेव पाखरे.

बातम्या आणखी आहेत...