आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीत फलक:सर्व दुकाने व आस्थापनांनी मराठी भाषेत फलक लावावे : आयुक्त

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या सूचनेनुसार नगर महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहेत. त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने व आस्थापना यांना आपले फलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असणार आहे.

दुकानांवरील पाट्या मराठी भाषेत असाव्यात, असा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मनपा आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून दुकाने व आस्थापनाने मराठीत फलक लावावेत, असे आदेश दिले. त्यासाठी १५ दिवसांची मुदतही देण्यात आली. मराठी भाषेत फलक नसल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, संबंधित दुकानदार वा आस्थापनेचा प्रमुख आपला नामफलक मराठीसह आणखी इतर भाषेतही लिहू शकतो. मात्र, मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षराचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, मद्यविक्री दुकानांच्या नामफलकांवर कुठेही गड-किल्ले, महनीय व्यक्तींचे नाव लिहीता येणार नाही, असेही शासनाने म्हटले.

बातम्या आणखी आहेत...