आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवण:आजी-आजोबांच्या संस्काराची शिकवण सर्वांनी करावी : सिस्टर मेरी यांचे प्रतिपादन

कोपरगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब व्यवस्थेत आजी-आजोबा महत्वाचा घटक आहेत. मात्र आभासी माध्यमं आणि बदलत्या संस्कृतीमुळे हे घटक दुर्लक्षित होऊ नयेत, आजी आजोबांनी दिलेले संस्कार पुढे टिकावेत, यासाठी सर्व शिक्षण संस्थांनी ही संस्काराची शिदोरी टिकवण्याचे शिक्षण ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत द्यावे, असे आवाहन सेवा निकेतन शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापिका सिस्टर मेरी कर्वालो यांनी केले. सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कुल मध्ये इयत्ता पहिली ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या सर्व पाल्यांचे आजी आजोबांना विशेष आमंत्रित करून त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

प्राचार्य सिस्टर जॉयलेट परेरा यांनी स्वागत करून आजी आजोबा दिवस का साजरा करायचा याची माहिती दिली. यावेळी उत्तमराव अंभोरे, सुवर्णा अंभोरे, शिवाजीराव उगले, मंदा उगले, गुलाब शिवरकर, पुष्पा शिवरकर, भगवान लोखंडे, तारा लोखंडे, खालिद मनियार, शबाना मनियार, एकनाथ हिवाळे, बेनुबाई हिवाळे, अकिल सय्यद, अनिसा सय्यद, साहेबराव रक्ताटे, छाया रक्ताटे, शंकर खंडागळे, आशा खंडागळे, दिनकर वाणी, सुशाला वाणी, सदाशिव कुलकर्णी व लिलावती कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.

बाळासाहेब पगारे व सदाशिव कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सिस्टर मेरी कर्वालो म्हणाल्या, आजी आजोबा यांच्यामुळे संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जतन करून पुढे चालवला जातो. जेष्ठ नागरिकांमुळेच आज भारतीय संस्कृती टिकून आहे. ते कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत. प्रास्ताविक शिराली शेख यांनी केले. सूत्रसंचालन वसीमा शेख व सुशांत म्हस्के यांनी केले. तर रमेश येवले यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...