आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारब्बी हंगामातील तक्ता नंबर १ व २चे काम तिन्ही यंत्रणांतील कर्मचाऱ्यांनी मिळून वेळेत पूर्ण करावे. टीआरए कार्डचे संकलन वेळेत पूर्ण करावे. पीकविमा योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. ही केंद्र शासनाची महत्त्वाची बाब आहे. दुर्लक्ष न करता सर्व यंत्रणांनी मिळून चांगले काम करावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी, महसूल, जिल्हा परिषद या यंत्रणांच्या कर्मचर्या पीक का पणी प्रयोग व कृषी गणना प्रशिक्षण कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगाम सन २०२२-२३ अंतर्गत देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तंत्र अधिकारी बाबासाहेब नितनवरे, मनोज कुमार (पुणे), अन्सार शेख, दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी पाटील म्हणाले, तिन्ही यंत्रणांनी मिळून पीककापणी प्रयोगाचे चांगले काम करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी प्रयोगासाठी प्लॉटची मोजमापे यांचे महत्त्वाचे टप्पे, प्रयोग घेण्यासाठीचे ठळक बाबी, क्षेत्रीय कामाबाबतच्या सूचना गाव पातळीवर समिती तयार करणे, गावे निवडण्याची कार्यपद्धती याबाबत विवेचन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.