आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या एमआयडीसी कार्यालयासमोरील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आयटी पार्कच्या मागणीसाठी शहर काँग्रेसच्यावतीने उपोषण करण्यात आले. उपोषणानंतर गुरुवारी रात्री उशिरा युवक काँग्रेसचे आनंद जवंजाळवर भ्याड हल्ला झाला.
हा प्रकार शहर विकासाच्या मागणीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत काळे बोलत होते. काळे म्हणाले, तथाकथित बनावट आयटी पार्कचा काँग्रेसने भांडाफोड केला. त्यावेळी माझ्यासह कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाला होता.
शहर विकास, तरुणांच्या रोजगारासाठी आम्ही आयटी पार्कच्या मागणीसाठी उपोषण केले. यात जवंजाळ सहभागी झाला होता. म्हणूनच त्याला टार्गेट केले गेले. शहरात दहशत आहे. दहशत करणारे कोण आहेत आणि त्यांचा राजकीय पक्ष कोणता ? हे नगरकरांना माहीत आहे. पण असे भ्याड हल्ले, काँग्रेस खपवून घेणार नाही. सत्तेची मस्ती चढलेल्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही.
आपण हत्याकांड जिरवू शकतो म्हणजे काहीही करू शकतो, असा त्यांचा गैरसमज झाला आहे. असे कितीही भ्याड हल्ले केले तरी शहर विकासासाठी लढणारे काँग्रेस कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. तसेच युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाटला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुझा मुलगा आयटी पार्कच्या उपोषणाला का बसला ? असे म्हणत धमकी देऊन विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून श्याम कदम, निरज तांबे, अक्षय धाडगे व इतरांच्या विरुद्ध तोफखाना पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जवंजाळवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व आरोपी फरार असल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, अलतमश जरिवाला, ॲड. अक्षय कुलट, आकाश अल्हाट आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.