आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार:वेतन पथक अधीक्षक कार्यालयात अनागोंदी सुरू असल्याचा आरोप

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेतन पथक अधीक्षक कार्यालयात अनागोंदी सुरू असल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक संघाने केला आहे. ही आनागोंदी थांबवा अशी मागणीही संघटनेच्या शिष्ट मंडळाने जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वेतन पथक अधीक्षक कार्यालयाबद्दल शिक्षकांकडून तक्रारी येत आहेत. याप्रकरणात शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली जाईल, असे संघटनेच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, नंदकुमार शितोळे, देवीदास पालवे, रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, प्रसाद साठे, दीपक दरेकर, अर्जुन भुजबळ, रामकृष्ण डांगे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात शिक्षक-शिक्षकेतरांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. वेतन पथक अधीक्षक कार्यालयाकडूनही अडवणूक केली जात आहे. याप्रकरणी त्वरीत वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता इतर सर्व जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये जमा झाला आहे. परंतु, अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात अद्याप हप्ता जमा झाला नाही. वैद्यकीय बिले, फरक आदीबाबत काय कारवाई झाली? असा सवाल शिक्षणाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...