आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याचे युग हे डिजिटल युगात युग आहे. सर्वत्र इंटरनेटचे वर्चस्व आहे. १९९० च्या दशकात आलेल्या या इंटरनेट सेवेमुळे १२० वर्षांपासून सुरू असलेली टपाल व्यवस्था संपुष्टात येईल, असे भाकित केले जात होते. इंटरनेटमुळे संवादाची परिभाषा बदलली असली तरी टपाल व्यवस्था मात्र संपलेली नाही. डिजिटल युगात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात निधी स्थानांतरण काही सेकंदात होते. तरीही आजच्या काळात टपाल खात्याच्या पारंपरिक ‘मनीऑर्डर’ व इतर सेवांचे महत्त्व मात्र अद्याप कायम आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्याला पैसे पाठवण्यासाठी पूर्वी टपाल खात्याच्या ‘मनीऑर्डर’चा वापर केला जात होता. मग डिजिटल युग आले.
नेट बँकिंगची सुविधा जवळजवळ सर्व बँकांनी उपलब्ध करून दिली. आधार कार्डला लाभार्थ्यांच्या खात्याशी जोडून सरकारी सहायता योजनांचा निधीही थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ लागला. या कामात पारदर्शकता आली आणि गैरव्यवहाराचे प्रमाणही कमी झाले. आता तर मोबाइल फोनद्वारेही ही सुविधा उलब्ध आहे. पण आजही दुर्गम भागात पत्र पोहोचवणारा पोस्टमन सरकारी योजनांचा लाभही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे.
शेवगाव टपाल विभागाने खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पार्सल सुविधा यात भरारी घेतली आहे. यात १ ते १० वर्षांच्या मुलींसाठी ग्रामीण भागात गावोगावी पोस्टमार्फत सुकन्या योजना राबवली जात आहे. यात २५० रुपयांपासून खाते सुरुवात करता येते. योजनेसाठी जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत भरना करता येतो. याविषयी पोस्ट खात्यामार्फत जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.
ग्रामीण भागातही बाल आधार कॅम्प घेण्यात येतात. यामध्ये ० ते ५ वयोगटातील बालकांचे आधार कार्ड नोंदणी केली जाते. यासाठी शेवगाव, पाथर्डी, बोधेगाव, बालमटाकळी, मिरी, तिसगाव, खरवंडी, वृद्धेश्वर कारखाना, अशा ८ सब पोस्ट ऑफिस यांच्या अंतर्गत ८९ टपाल कार्यालये आहेत. यामधून सर्व सुविधा दिल्या जातात. यासाठी १३० कर्मचारी कार्यरत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ टक्के व्याजदरांची सुविधा उपलब्ध आहे. आवर्त ठेव ही १०० रुपयांपासून पुढे जास्तीत जास्त ठेवता येते.
यात सेविंग अकाउंटमध्ये एटीएम कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, या सुविधेचा अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. योजनेला केंद्र सरकार संचार मंत्रालयाच्या वतीने सुरक्षिततेची हमी दिली जाते. भविष्य निर्वाह निधीची योजना सुरू आहे, ३९६ रुपये भरून बँकेमार्फत दहा लाख विमा कवच दिले जाते. यामध्ये सर्पदंश, अपघाती निधन, अपघात यासाठी विमा कवच दिला जातो, अशी माहिती उपविभागीय डाक निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.