आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेरला पवारांची साथ कायम:सत्ता बदलली असली तरी मतदारसंघातील विकास कामांत अडचणी नाहीत - आ. नीलेश लंके

अहमदनगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ता बदलली असली तरी मतदारसंघातील विकास कामांत अडचणी येणार नाहीत. माझ्या डोक्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबाचा हात आहे. त्यामुळे मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधीपक्षनेते अजित पवार आपणास विकास कामात मदत करतील. सरकार बदलले म्हणून विकास कामांबाबत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, असे प्रतिपादन पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी केले.

नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादीच्या वतीने मतदारसंघातील 63 शाळांमधील सुमारे 2200 विद्यार्थ्यांना शुक्रवारी (22 जुलै) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 हजार वह्या, 5 हजार पेन, कंपास पेट्यांचे तसेच गरजू विद्यार्थ्यांना 165 सायकलींचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय दृष्टीहिन संघटनेला 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश संभाजी भोर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, अशोक सावंत, सुदाम पवार, राजेंद्र चौधरी, कारभारी पोटघन,दादा शिंदे,दिपक लंके,जितेश सरडे, ठकाराम लंके, किसनराव रासकर, बाळासाहेब खिलारी, डॉ.बाळासाहेब कावरे,नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, नितीन आडसुळ, सचिन पठारे, बाळासाहेब नगरे, गंगाराम बेलकर,प्रभाकर कवाद, योगेश मते,अशोक चेडे,भूषण शेलार, डॉ सचिन औटी,विजय डोळ, सुवर्णा धाडगे, पूनम मुंगसे आदी उपस्थित होते.

समाजात गरीब आणि श्रीमंत ही मोठी दरी

आमदार लंके म्हणाले, आजही समाजात गरीब आणि श्रीमंत अशी मोठी दरी आहे. तळागाळातील गरीब जनतेचे रोजचे जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी गावागावांतील कार्यकर्त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यांना व्यक्तिगत पातळीवर शक्यती मदत केली तर त्यांचे जगणे काही प्रमाणात सुसह्य होण्यास मदत होईल.

साहित्य पुरवण्यासाठी पुढाकार घ्या

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील तसेच माध्यमिक शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांकडे आवश्यक शैक्षणिक साहित्य नाही,अनेकांच्या पायात चपला नसतात, अनेक विद्यार्थी चार -पाच किलोमीटर पायी चालत शाळेत येतात.अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,सायकल,चपला पुरवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.गावाचा शैक्षणिक विकास झाला,गोरगरीबांचे जगणे काही प्रमाणात सुसह्य झाले तरच गावाच्या भौतिक विकासाला अर्थ आहे, असेही लंके म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...