आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रच्या सेक्रेटरीपदी अमित मुथा यांची निवड

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन इंटरनॅशनल ट्रेड आर्गनायझेशन (जितो) संघटनेच्या जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्राची २०२२-२०२४ ची कार्यकारी समिती जाहीर झाली. यात जितो अहमदनगरचे माजी अध्यक्ष अमित मुथा यांची सेक्रेटरीपदी, तर जितो सीएफई राष्ट्रीय समिती सदस्यपदी नगरच्याच सुमंगला गौतम मुनोत यांची नियुक्ती करण्यात आली. अमित मुथा यांनी जितो अहमदनगरचे सेक्रेटरीपद तसेच अध्यक्षपद भूषवले आहे.

आता रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत त्यांना स्थान मिळाले आहे. सुमंगला गौतम मुनोत यांनी जितो अहमदनगर अंतर्गत सेंटर फॉर एक्सलन्सच्या (सीएफई) समन्वयक म्हणून काम पाहताना आधुनिक काळातील कौशल्य पूर्ण प्रोग्राम, कोर्सेस तरुणाईपर्यंत नेले. आता त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...