आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:अमोल भनगडे पुन्हा भाजपमध्ये दाखल

देवळाली प्रवराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता राष्ट्रवादीत त्यांचे फारसे मन न रमल्याने मुंबई येथे गुरुवारी दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत स्वगृही परतले.माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी २ मार्च २०२२ रोजी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कर्डिले यांचे जवळचे समजले जाणारे अमोल भनगडे हे राष्ट्रवादीत गेल्याने सर्वांना धक्का बसला. जिल्हा परिषद निवडणुकीत भनगडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी कबूल केली असावी असे अनेकजण अंदाज बांधत होते. मात्र अमोल भनगडे यांचे राष्ट्रवादीत मन रमत नव्हते. खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या सतत संपर्कात होते. विखे व कर्डिले यांच्या उपस्थितीतील अनेक कार्यक्रमांना अमोल भनगडे हजेरी लावत असत.

त्यामुळे भनगडे पुन्हा भाजपात दाखल अशी चर्चा सुरू होती. गुरुवारी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या समवेत भनगडे हे मुंबईत पोहोचून भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार राम शिंदे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पोपट कोबरणे, विकास कोबरणे, विलास कोबरणे, प्रमोद कोबरणे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...