आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिक जाहीर:नाशिकमधील स्पर्धेत अमोल निर्मळ ठरले सर्वोत्तम चित्रकार

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नाशिक येवला मध्ये साहित्य कला व सांस्कृतिक विभागामार्फत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ५५० चित्रकारांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे . डॉ सी एम मेहता कन्या विद्या मंदिर मधील कलाध्यापक अमोल बाळासाहेब निर्मळ यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

या पारितोषिकाचे स्वरूप रोख रुपये ११,१११ सन्मान चिन्ह , व प्रमाणपत्र असून त्यांना ते पारितोषिक येवला येथील एका भव्य कार्यक्रमात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे. निर्मळ यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद , नाशिक, सोलापूर, अहमदनगर अशा राज्य भरातील ५५० चित्रकारांमधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...