आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Among The 323 Villages In The District, One Village Has One Ganpati; The Activity Was Implemented In The Maximum Number Of 112 Villages Under Akole And Rajur Police Limits| MARATHI NEWS

गणेशाेत्सव:जिल्ह्यातील 323 गावांमध्ये एक गाव एक गणपती; अकोले व राजूर पोलिसांच्या हद्दीत सर्वाधिक ११२ गावांत राबवला उपक्रम

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक गाव एक गणपती संकल्पनेतून यंदा जिल्ह्यातील ३२३ गावांत उपक्रम राबवत सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकोले तालुक्यातील अकोले व राजूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ११२ गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली.गणेशोत्सव काळात गावात गट-तट निर्माण होऊन वाद होतात. त्यातून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गेल्या काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे. पोलिस ठाण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या हद्दीतील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येते. पोलिस ठाण्यामार्फत गावांमध्ये बैठक घेऊन, या योजनेसंदर्भात प्रबोधन करण्यात येते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून ही संकल्पना मागे पडत असल्याने उपक्रम राबविणाऱ्या गावांची संख्या कमी होत आहे.

अशा परिस्थितीतही यंदा अकोले तालुक्यातील अकोले व राजूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११२ गावांनी हा उपक्रम राबवून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. पारनेर तालुक्यात पारनेर व सुपा पोलिस ठाणे हद्दीतील ३८ गावात, संगमनेर शहर व तालुका पोलिस ठाणे हद्दीतील ३६ गावामध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. शेवगाव तालुक्यात केवळ एका गावात, कर्जत तालुक्यात यास प्रतिसाद मिळाला नाही. लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात या संकल्पनेला प्रतिसाद मिळत नाही. त्या तुलनेत एक हजार, दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांत ही संकल्पना वाढीस येत आहे.

पोलिस ठाणेनिहाय गावे
पारनेर २३, सुपा १५, नगर तालुका १६, एमआयडीसी २, श्रीगोंदे १३, बेलवंडी १०, जामखेड १८, शेवगाव १, पाथर्डी ५, नेवासा १०, शनिशिंगणापूर १, सोनई २, शिर्डी २, राहाता ५, लोणी ३, कोपरगाव तालुका ३, कोपरगाव शहर २, राहुरी १८, श्रीरामपूर शहर ४, श्रीरामपूर तालुका ४, संगमनेर शहर १०, संगमनेर २६, राजूर ७२, अकोले ४०, घारगाव १४, आश्वी ३.

बातम्या आणखी आहेत...