आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव:स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव; हर घर तिरंगा अभियानासाठी विविध उपक्रम

संगमनेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने शासनाच्या वतीने संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत असून नागरिकांनी या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य उपक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी डॉ. मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी वाघ यांच्या उपस्थितीत पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक व कार्यकर्ते उपस्थित होते. ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यासाठी पालिका सज्ज असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांमध्ये अभियानाबाबत जनजागृती कर्णावती मंगळ वारी क्रांतिदीप औचित्य साधून स्वातंत्र्य युद्धात हौतात्म्य आलेल्या हुतात्म्यांना नेहरू चौकातील अशोक स्तंभ येथे सकाळी ९ वाजता पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. पालिका, संगमनेर महाविद्यालय छात्रसेना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांना तिरंगा ध्वज खरेदी कर्णावती पालिका कार्यालयात केंद्र उभारण्यात आले असून बचत गटातील महिला घरोघरी जाऊन तिरंगा ध्वजाची विक्री करणार आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालयात ध्वज विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तरी नागरिकांनी तिरंगी ध्वजाची खरेदी करावी, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...