आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:युवतीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट खाते तयार करणाऱ्या एका आरोपीला केली अटक

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवतीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून या अकाऊंटवरून तिला अश्‍लिल मेसेज व व्हिडीओ पाठविणाऱ्यायाला येथील सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो पीडित युवतीचा नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्जत तालुक्यातील एका युवतीच्या नावे अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. सदर अकाऊंटवरून युवतीला अश्‍लिल मेसेज व व्हिडीओ पाठविले.

पीडितीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात पीडित युवतीने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व त्यांच्या पथकाने केला. तपासादरम्यान बनावट अकाऊंट युवतीच्या नातेवाईकानेच केेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...