आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला आपल्या कार्यातून मानसन्मान मिळवून दिल्याने बहुजन समाजात या राष्ट्र पुरुषांना मोठे स्थान आहे. पण राज्यातील काही जबाबदार मंडळी या राष्ट्रपुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत. याच्या निषेधार्थ बुधवारी, दि. २१ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. श्रीगोंदे बंदही पुकारला आहे.
महापुरुष अस्मिता बचाव समिती श्रीगोंदेने सांगितले की, तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व चळवळीतील कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून सर्व पक्षीय बैठकीत २१ डिसेंबर रोजी बंद पाळण्याचे तसेच निषेध मोर्चा काढण्याचे ठरले. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. दि. १३ रोजी सायंकाळी संत शेख महमंद महाराज यांच्या मठात बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे ५० प्रमुख नेते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत एकमताने मोर्चा व तालुका बंदचा निर्णय झाला.
यावेळी घनश्याम शेलार, राजेंद्र म्हस्के, स्मितल वाबळे, बाळासाहेब दूतारे, संभाजी बोरुडे, अरविंद कापसे, समीर शिंदे, गोरख घोडके, मुकुंद सोनटक्के, मीरा शिंदे, सुभाष बोराडे, सुरेश ननावरे, बापू माने, अमर घोडके, प्रशांत सिदनकर, आमीन शेख, अविनाश घोडके, राजाभाऊ जगताप, नानासाहेब शिंदे, संदीप उमाप, जितेंद्र पाटोळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.