आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघे जण पालघर पोलिसांच्या ताब्यात:अमेरिकन बनावटीचे पिस्टल आढळले

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि महाराष्ट्राच्या तपासणी नाक्यावर पालघरच्या तलासरी पोलिसांच्या तपासणी दरम्यान संगमनेरच्या तिघा तरुणांकडे मेड इन युएसए असा शिक्का असलेले अमेरिकन बनावटीचे परदेशी पिस्टल आणि जिवंत काडतुसे मिळून आले. त्यामुळे तलासरी पोलिसांनी या तिघा तरुणांकडे असलेली पिकअप जीप, पिस्टल आणि काडतुसे असा ८ लाख २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत त्यांना गजाआड केले. यामुळे संगमनेरात खळबळ उडाली आहे.

इरफान युनूस शेख (वय २५), मुसा हारूण शेख (वय २८), समित लाजरस खरात (वय ३० कुरण रोड,‌‌ संगमनेर) असे पकडलेले आरोपी आहेत. नाकाबंदी दरम्यान उधवा-कोदाड रस्त्यावर दळवी पाडा येथे पिकअपची (एम.एच. ४१ जी ३२७३) पोलिसांनी तपासणी केली असता, तिघांनी गुजरातला जात असल्याचे सांगितले. मात्र, तलासरी पोलिसांचा संशय बळवल्याने त्यांनी पिकअपची तपासणी केली. पोलिसांना एका प्लास्टिक पिशवीत एक पिस्टल आणि जिवंत काडतुसे मिळाली. बाहेरील बाजूला लाकडी प्लेट स्क्रूने फिट केलेला सुमारे सहा सेंटीमीटर लांबीचा व सुमारे साडेचार इंच रुंदीचा हा पिस्टल आहे. तसेच के एफ ७६५ मार्क असलेले पिस्टलचे दोन जिवंत राऊंड मिळून आले.

तलासरी पोलिसांनी आरोपींच्या ताब्यात असणारी पिकअप आणि शस्त्र जप्त करत त्यांना अटक केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सातवी यांच्या फिर्यादीवरून तलासरी जिल्हा, पालघर येथील पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलमसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तपास फौजदार समीर लोंढे हे करत आहेत. दरम्यान या संदर्भात संगमनेरच्या बजरंग दलने नगरच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले असून आरोपी गोवंश हत्या व गोवंश मांस तस्करी करणारे आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याची सखोल चौकशी झाली तर कुरण येथे अवैद्य शस्त्रे सापडण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...