आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती:टाकळीभान येथे सापडली शनिदेवाची पुरातन मूर्ती

टाकळीभान3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे पुरातन आणि साक्षात शनिदेवाचे रूप कोरलेली कपाळी चंद्रकोर असलेली कोरीव मूर्तीची शिळा सापडली. तिची नुकतीच काही ग्रामस्थांच्या व विठ्ठल मंदिराचे पुजारी राजेंद्र देवलालकर गुरु यांच्या हस्ते पूजाअर्चा करण्यात आली. श्रावणी सोमवारी सापडलेल्या मूर्तीचे महत्त्व काही वेगळेच आहे. टाकळीभान येथील राजवाडा परिसरात असलेल्या जुनी बारव आहे. तेथे शनिदेवाची मूर्ती असल्याची माहिती येथील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव धुमाळ यांना मिळाली. त्यांनी गावकऱ्यांना याबद्दल माहिती दिली.

गावातील गावकरी व विठ्ठल मंदिराचे पुजारी राजेंद्र देवलकर यांच्यासह सर्वजण त्या ठिकाणी त्या मूर्तीची शोधाशोध करू लागले. काही वेळातच मूर्ती असल्याचे त्यांना लक्षात आले. ही मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. साक्षात शनिदेवाचा साक्षात्कार झाल्याचे बोलले जात आहे. शनिदेवाची शिळा व त्यावर कोरलेले शनिदेव याकडे विशेष लक्ष ओढले जात आहे. मूर्ती बघण्यासाठी गावातील ग्रामस्थ गर्दी करू लागले आहेत. यावेळी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शिवाजीराव धुमाळ, ॲड. रत्नाकर रणनवरे, माजी सरपंच भाऊसाहेब मगर, बंडोपंत बोडखे, विष्णुपंत पटारे, मधुकर गायकवाड, नानासाहेब रणनवरे, बापूसाहेब शिंदे, विठ्ठल मंदिराचे पुजारी राजेंद्र देवळालकर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...