आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राहात्यात राबवण्यात आली अतिक्रमण हटाम मोहिम

राहाता17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी गुरुवारी दुपारनंतर अतिक्रमण हटावची कारवाई करून मुख्य चौकातील खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकाने हटवली आहेत. शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सतनाम कापड दुकाना समोरील इरिगेशनच्या जागेलगत गटारावर असणाऱ्या या गाड्या हटवल्या आहेत.

नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या या अतिक्रमण हटाव कारवाईचे सुज्ञ नागरिकांनी स्वागत केले आहे. या ठिकाणी गटारात तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे ग्लास पिशव्या पडलेल्या असायच्या. हे प्लास्टिक व कचरा येथील गटारात जाऊन गटारी तुंबत होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेले असल्याचे सांगितले जात आहे.या ठिकाणच्या गाड्यांमुळे शालेय विद्यार्थिनी व महिला या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना असुरक्षित वाटत होते. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता पालिका प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना अथवा मार्ग काढावा, अशी मागणी सुद्धा शहरातील नागरिकांमधून होत आहे. नगरपरिषदेने कारवाई केलेल्या पथकामध्ये नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते. त्याचबरोबर पोलीस पथकही तैनात होते.

बातम्या आणखी आहेत...