आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:आदिवासींबद्दल अनुद्गार : भाजपचे जिल्हाध्यक्ष गोंदकरांच्या निषेधार्थ मोर्चा

अकोले6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी अकोल्यात येऊन आदिवासींबद्दल अनुउद्गार काढल्याच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांसह तरुणांनी अकोले शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून घोषणाबाजी केली.

मोर्चाचे नेतृत्व मुकुंद लहामटे, संतोष बोटे, विजय मेंगाळ, प्रशांत भांगरे, कृष्णा बांडे आदींनी केले. मोर्चात “या राजेंद्र गोंदकराचे करायचं काय, खाली डोकं वर पाय” “ऊठ आदिवासी जागा हो, संघर्षांचा धागा हो” अशी घोषणाबाजी करीत आदिवासी तरुणांनी भाजप जिल्हाध्यक्ष गोंदकर यांना आम्ही वनवासी नसून या देशाचे मुळनिवासी आहोत, असा इशारा देत गोंदकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

तालुक्यातील राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड पितापुत्रांसमक्ष त्यांनीच आयोजित केलेल्या भारताच्या नवनिर्वाचित आदिवासी महिला राष्ट्रपतींचे आभार व्यक्त करण्याच्या जाहीर कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्या भाषणातून आदिवासींबद्दल अनुउद्गार काढल्याचा आरोप होत आहे. नी आदिवासींच्या भावना दुखावल्याबद्दल असंतोष खदखदत आहे. यावेळी गोंदकर यांच्याकडून बोलताना आदिवासींचा नामोल्लेख वनवासी म्हणून करण्यात आला. आदिवासींना त्यांनीच आयोजित केलेल्या नवनिर्वाचित आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार व्यक्त करण्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात आदिवासींना वनवासी संबोधले. याच्या निषेधार्थ गुरुवारी तालुक्यातील आदिवासी भागांतील कार्यकर्त्यांसह तरुणांकडून अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आम्ही वनवासी नसून या देशाचे मूलनिवासी आहोत. आदिवासींना वनवसी संबोधण्याचा प्रताप केलेल्या गोंदकर यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी यावेळी आदिवासींंमधून करण्यात आली. मोर्चा अकोल तहसील कार्यालयावर आल्यानंतर तहसीलदार सतीश थेटे यांना आदिवासी तरुणांनी निवेदन सादर केले.

बातम्या आणखी आहेत...