आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी राजकारण:तळमळीने काम करणाऱ्या माणसांची फौज हे यशस्वी राजकारणाचे गमक

श्रीगोंदे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळमळीने काम करणारे माणसे हे यशस्वी राजकारणाचे गमक असतात. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी अशी माणसे कटिबद्ध असतात. त्यांच्यामुळे परिसराचे भवितव्य उज्ज्वल घडते, असे मत प्रकट करत सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी वांगदरी गाव भविष्यात तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

वांगदरी येथे ग्रामसंसदेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवारी अभिनेत्री किशोरी शहाणे, भास्करराव पेरे, चांडाळ चौकडी फेम विनोदी कलाकार प्रा. विष्णू भारती, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस व दत्तात्रय पानसरे यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे होते. जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी प्रास्ताविक केले.

सरपंच आदेश नागवडे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाची दोर एकदम सुरक्षित आहे. त्यांच्या आग्रहामुळे मला यावे लागले असेही शहाणे यावेळी बोलताना म्हणाल्या. यावेळी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त भास्करराव पेरे यांनी वांगदरी गाव भविष्यात विकासाचे मॉडेल ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. विनोदी कलाकार प्रा. विष्णू भारती यांनी आपल्या डायलॉगबाजीने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, बाबासाहेब भोस, दत्तात्रय पानसरे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला दीपक नागवडे, शुभांगी पोटे, कल्याणी लोखंडे, गणपत काकडे, उपसरपंच शिवाजी चोरमले यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. आदेश नागवडे यांनी सर्वांचे स्वागत करत आभार मानले.तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला येईल नागवडे कुटुंबीयांचे मोठे राजकीय सामाजिक योगदान आहे. आता त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणे गरजेचे आहे. २०२४ ची विधानसभा निवडणूक अनुराधा नागवडे यांनी नक्की लढवली पाहिजे. मी त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी परत तुमच्या तालुक्यात येईल, असा शब्द किशोरी शहाणे यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...