आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवलिया:दाताने ओले व वाळलेले नारळ सोलण्याचा छंद असलेला अवलिया

नवनाथ कुताळ | श्रीरामपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात प्रत्येक माणूस छंदी असतोच. आपल्याला लवकर विळा अथवा कोयत्याने नारळ सोलले जात नाही. मात्र तालुक्यातील ऐनतपूर बेलापूर येथील इरफान शेख यांना दाताने नारळ सोलण्याचा छंद आहे. जुन्या काळातील लोक दाताने कडक हरभरे फोडायचे असे म्हटले जायचे. मात्र आजकाल चॉकलेट, फास्टफूड आदी कारणांमुळे अनेकांचे दात पडले आहेत. लहान वयात मुलांचे दात खराब होत आहेत. अनेकांना दंत वैद्याचे उपचार सुरू आहेत. अनेकांना साधा ऊसही सोलता येत नाही एवढे नाजूक दात आहेत. मात्र या सर्वांचे उलट इरफान यांचे दात आहेत.

त्यांना दाताने नारळ सोलण्याचा छंद लागला आहे. ते कोठेही गेले किंवा मंदिरात गेले तरी ओले वाळलेले नारळ सोलून उपस्थितांना चकीत करतात. इरफान शेख हे सध्या श्रीरामपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागात विशेष शिक्षक प्रवर्ग मतिमंद मुलांसाठी तालुक्यातील शाळातील मुलांना मार्गदर्शन करीत आहेत. मित्राच्या शेतात गेला असतानी एका नारळाच्या झाडाखाली बसलो होतो. नारळाच्या झाडाखाली बसून नारळ त्यातील पाणी पिण्याचा मोह झाला.

त्यानंतर नारळ पाडून दाताने सोलण्याचा प्रयत्न केला.सुरुवातीला दात दुखले मात्र सराव सुरू ठेवला आणि तो यशस्वी झाल्याचे इरफान सांगतात. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल सप्टेंबरमध्ये श्रीरामपुरात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे होते. शेख यांनी तहसील कार्यालय येथे त्यांच्यासमोर मिनिटभरात दाताने नारळ सोलून दाखवले. आतापर्यंत २०० पेक्षा ओले नारळ व १०० च्या आसपास वाळलेले नारळ सोलले आहेत. दात व जबड्याला सवय झाल्याने ते दुखत नाहीत, असे शेख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...