आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:मविआ काळातील महसूल खात्याच्या कारभाराची चौकशी

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील महसूल खात्याच्या कारभाराची चौकशी करण्याचे संकेत देत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. भविष्यात काय चांगले करता येईल, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपद थोरातांकडे होते. त्यावेळी विरोधात असलेल्या विखेंनी महसूल खात्याच्या कारभारावर टीका करत चौकशी होण्याची गरजही व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी महसूल विभागाच्या कारभाराच्या चौकशी संकेत दिले.

विखे म्हणाले, महसूल मंत्री म्हणून माझी आताच नियुक्ती झाली आहे. पण मागे काय घडले, याची चौकशी करावी लागेल. प्रत्येक वेळी ज्या आरोपांना आपल्याला सामोरे जावे लागते, ते पाहता अधिक पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करणार आहे. आमच्या सरकारचे भ्रष्टाचारमुक्त शासन हे मुख्य धोरण आहे.

बातम्या आणखी आहेत...