आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांमध्ये धक्काबुक्की:सावेडीत पोलिस जखमी झाल्याच्या घटनेची चौकशी

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी सावेडी उपनगरी पाइपलाइन रोडवर युवकांमध्ये धक्काबुक्की होऊन झालेल्या गोंधळात वरिष्ठ पोलिस अधिकारी जखमी झाल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. सावेडी उपनगरात पेट्रोल पंपाजवळ गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी युवकांमध्ये धक्काबुक्की झाली.

त्याचे पर्यावसन हाणामारी व किरकोळ दगडफेकीत झाले. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र, या गोंधळात तोफखाना पोलिस ठाण्यातील एक वरिष्ठ अधिकारी जखमी झाले. घटनेवेळी झालेल्या दगडफेकीमुळे अधिकारी जखमी झाल्याची चर्चा आहे.

मात्र, युवकांना पांगवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका पोलिस कर्मचाऱ्याची लाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्याला लागल्यामुळे ते जखमी झाल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दोन दिवस लोटले तरी या संदर्भात तोफखाना ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला नसल्याने चर्चांना उधाण आले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षक पाटील यांनी या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपअधीक्षक अनिल कातकडे व तोफाखाना पोलिसांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...