आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा हल्‍ला:बिबट्याच्या हल्ल्यात निमगाव खुर्द येथील वृद्ध महिला ठार

संगमनेर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेळ्यांची शिकार करायला आलेल्या बिबट्याने झोपेत असलेल्या मिराबाई रामभाऊ मेंगाळ (वय ६२, मेंगाळवाडी) या महिलेवर हल्ला करत ठार केले. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता तालुक्यातील निमगाव खुर्द येथे ही घटना घडली.

मिराबाई मेंगाळ तिच्या अपंग मुलासमवेत निमगाव खुर्द येथील वनविभागाच्या चंदन टेकडी जंगलाजवळ राहत होती. तिचे पती गावात राहतात. तर आणखी एक मुलगा शेती वाट्याने करत असल्याने बाहेर होता. मिराबाई मेंगाळ शेळ्या चारण्याचे काम करून उदरनिर्वाह चालवत होत्या. मेंगाळ मंगळवारी मुलासह छपरात काळी रग ओढून झोपलेल्या असताना शेळ्यांवर हल्ला करण्यास आलेल्या बिबट्याने शेळी समजून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना दूरवर फरफटत नेत ठार केले. तिच्या मुलाने आरडाओरड केला मात्र, काही उपयोग झाला नाही. हि माहिती गावकऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बाळासाहेब गोपाळे व पोलिस पाटील गोरक्ष गोपाळे यांनी घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना दिली. वनक्षेत्रपाल सचिन लोंढे, वनपाल संगीता कोंढार, जोशना बेंद्रे, राकेश कोळी यांनी घटनास्थळी येत मेंगाळ यांना पालिकेच्या कुटीर रुग्णालयात नेले. त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. मेंगाळ यांच्या शरीराच्या जखमांवरून बिबट्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोस्टमार्टम अहवालानंतर शासकीय मदतीची कार्यवाही होईल. मेंगाळ यांच्या वारसांना २० लाखाची मदत दिली जाईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल सचिन लोंढे यांनी दिली. या भागात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...