आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:निपाणी वडगाव येथे रस्त्यावर उभे वाहन अज्ञात व्यक्तिने पेटवले

श्रीरामपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निपाणी वडगाव येथील वैदू वसाहत येथे रवी लोखंडे यांच्या मालकीचे पार्क केलेले चार चाकी वाहन अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली.रवी लोंखडे यांच्या मालकिचे चार चाकी वाहन अज्ञात व्यक्तीने गाडीच्या काचा फोडून पेटवून दिले. रात्रीच्या वेळी आगीचा डोंब दिसत असल्याने स्थानिक नागरिकांनी रवी लोंखडे यांची बहिण मनिषा लोंखडे यांना कळवली.

वैदू समाज बांधवानी बोअरवेल सुरु करुण आग आटोक्यात आणली.मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.परिसरातील नातेवाईक व नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिस नाईक शरद आहिरे व किरण पवार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. याबाबत रवी लोखंडे यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलीस नाईक शरद आहिरे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...