आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फनफेअर उद्घाटन:नवउद्योजक महिलांच्या व्यवसाय वृद्धीसाठीआनंदमेळा ठरेल मैलाचा दगड : मालपाणी

संगमनेर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ, संगमनेर व माहेश्वरी ज्युनियर महिला मंडळाचे फनफेअरचे आयोजन नवउद्योजक महिलांना प्रेरणादायी व व्यवसायवृद्धीसाठी मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सुवर्णा मालपाणी यांनी केले.

महिला दिनानिमित्त येथील भंडारी मंगल कार्यालयात लायन्स क्लब ऑफ, संगमनेर व माहेश्वरी ज्युनिअर महिला मंडळ यांनी रविवार व सोमवारी आयोजित केलेल्या फनफेअर उद्घाटन प्रसंगी सुवर्णा मालपाणी बोलत होत्या. लायन्सच्या अध्यक्षा सुनिता पगडाल, माहेश्वरी ज्युनिअरच्या उज्वला नावंदर, कल्पना मालपाणी, लायन्सचे झोन अध्यक्ष श्रीनिवास पगडाल, पोद्दार स्कूलच्या प्रियंका गायकवाड, अशोक उदावंत, श्रीनिवास भंडारी, परफेक्ट फाउंडेशनच्या सुनिता कोडे, माजी उपनगराध्यक्ष पुनम मुंदडा, डॉ. अबोली गांधी, केदारनाथ राठी, राजेश लाहोटी, स्वप्नाली तापडे, शिल्पा नावंदर, बबिता आसावा, स्वाती नावंदर, वासंती ठाकूर यावेळी उपस्थित होते.

मालपाणी म्हणाल्या, संगमनेर विकासाभिमुख शहर असून ३०-३५ वर्षांपूर्वी छोट्या गोष्टींसाठी पुणे-मुंबईला जावे लागायचे. येथे महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध नव्हत्या. मात्र परिस्थिती बदलल्याने सर्व उद्योग व्यवसाय व शैक्षणिक संस्था येथे प्रगती करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...