आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:आनंद संस्कार शिक्षा अभियान सुरू

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या जीवनाला आकार देताना आनंदासह शिक्षा व संस्कार देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या आनंद संस्कार शिक्षा अभियानाला दोन वर्षांच्या करोना काळानंतर पुन्हा सुरूवात झाली. यावर्षीची पहिली कार्यशाळा नुकतीच पार पडली. यात मुलांना डायनिंग एटीकेटस आणि टेबल मॅनर्स शिकवण्यात आले. भारतीय संस्कृती, जैन धर्मात जेवणाचे असलेले नियम मुलांना सांगण्यात आले. त्याचे रोज आचरण करण्याचे आवाहन करण्यात आले.

आनंद संस्कार शिक्षा अभियानाच्या पहिल्या दिवशी आनंदधामचा परिसर मुलांच्या किलबिलाटाने बहरून गेला. सर्वप्रथम सिमरन मुनोत यांनी नवकार महामंत्र, प्रार्थना व गुरू स्मरण घेतले. यानंतर सीमा मुनोत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यशाळेत मेरू कर्नावट यांनी मुलांना डायनिंग एटिकेटस, टेबल मॅनर्स शिकवले. नीता बोरा यांनी आभार मानले. बाबूशेठ लोढा यांच्या वतीने सर्व मुलांना अल्पोपहार देण्यात आला. रमेश बोरा यांच्यावतीने सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यशाळेसाठी नूतन गांधी, प्रतिभा गांधी, योगिता कर्नावट, बबिता गांधी, तनुजा भंडारी, रेश्मा कोठारी, सुवर्णा मुनोत, सपना कटारिया, सीमा मुनोत, सिमरन मुनोत तसेच ब्राम्ही युवती मंचच्या युवतींनी परिश्रम घेतले.