आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातत्याने आनंदऋषीजी हॉस्पिटल गरीब - गरजू रुग्णांकरीता मोफत शिबिरे घेतात, त्यामुळे रुग्णांकरिता हे एक वरदान ठरत आहे. ही समाजाच्या दृष्टीने एक चांगली बाब आहे. समाजातील दु:ख निवारण्याचे काम जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या वतीने होत आहे. या कार्याची व्याप्ती आणखी वाढून त्याचा जास्तीत जास्त गरजूंना लाभ व्हावा, यासाठी हॉस्पिटलने आता यापुढेही अशीच सेवा सुरू ठेवावी, असे प्रतिपादन मनसेचे सचिव नितीन भुतारे यांनी केले.
आचार्य श्रीआनंदऋषीजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशनव्दारा संचलित श्रीआनंदऋषीजी हॉस्पिटल अॅण्ड हार्ट सर्जरी सेंटरमध्ये स्व.राहुल रमेशचंद्र बाफना यांच्या स्मरणार्थ आयोजित बालरोग तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन आयोजक निर्मल अॅडर्व्हटायझिंगचे रमेशचंद्र बाफना यांच्या हस्ते झाले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, उपाध्यक्ष मनोज राऊत, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुमित वर्मा, तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा पतसंस्थेचे अध्यक्ष किरण शिंगी, रेल्वेचे मुख्य आरक्षण अधिकारी प्रसाद उमेश, निर्मल बाफना, संतोष बाफना, रुपाली बाफना, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, बालरोग तज्ज्ञ डॉ.वैभवी वंजारे, डॉ.सोनाली कणसे, संतोष बोथरा, सतीश लोढा, प्रकाश छल्लानी, डॉ.आशिष भंडारी, सुभाष मुनोत, वसंत चोपडा आदी उपस्थित होते.
रमेशचंद्र बाफना म्हणाले, रूग्णसेवा हा एक यज्ञ असून तो सातत्याने चालविणे अवघड काम आहे हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचे काम जैन सोशल फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने करत आहे हे गौरवास्पद बाब आहे. यावेळी सचिन डफळ, सुमित वर्मा यांनीही हॉस्पिटलच्या सेवा कार्याचे कौतूक केले. प्रास्ताविक डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. या शिबिरामध्ये सुमारे २१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.