आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविविध कामांसाठी राज्य-परराज्यात विविध गेल्यावर तिथे आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या चांगल्या व अत्याधुनिक रुग्णसेवा कार्याची प्रचिती ऐकावयास मिळते .या हॉस्पिटलने अत्याधुनिकतेचा ध्यास घेऊन रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा व तीही अत्यल्प दरात कशी देता येईल यासाठी प्रयत्न केला जातो. हे कौतुकास्पद आहे. नगरकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन संग्राम जगताप यांनी दिली.
श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल व हार्ट सर्जरी सेंटरच्यावतीने राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांच्या १२२ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा प्रारंभ आमदार जगताप व शिबिराचे प्रायोजक सीए रमेश व सविता रमेश फिरोदिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. जनरल सर्जरी व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया या शिबिरासाठी रमेशभाऊ फिरोदिया एजुकेशनल ट्रस्टचे योगदान लाभले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अभिजित खोसे,किशोर बाफना (धुळे), डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. विवेक भापकर, डॉ. भास्कर जाधव, जैन सोशल फेडरेशनचे डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा,निखिलेन्द्र लोढा,माणकचंद कटारिया,सुभाष मुनोत,वसंत चोपडा,प्रकाश छल्लाणी आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत संतोष बोथरा यांनी करुन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून अविरतपणे सुरु असलेल्या रुग्ण सेवा कार्याची सविस्तर माहिती दिली. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले. या शिबिरात १५२ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.