आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा‎:सावेडी उपनगराच्या पाणी प्रश्नासाठी‎ संतप्त महिलांचा मनपावर हंडा मोर्चा‎

नगर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील सावेडी उपनगराचा‎ गेल्या आठ महिन्यांपासून पाणी‎ पुरवठा विस्कळीत झाला आहे.‎ महापालिका प्रशासनाकडे वारंवार‎ पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी‎ बैठका घेऊन अनेक निवेदन दिले‎ होते. मात्र प्रशासनाच्या‎ हलगर्जीपणामुळे व नियोजनाच्या‎ अभावामुळे नागरिकांना पाणी‎ टंचाईला सामोरे जावे लागते.‎ त्यामुळे संतप्त झालेल्या सावेडी‎ उपनगरातील महिलांनी शुक्रवारी‎ महापालिकेवर हंडा मोर्चा काढून‎ प्रशासनाला जाब विचारला.‎

दरम्यान अहमदनगर शहरातील‎ तपोवन व सावेडी रोड परिसरातील‎ भागात अमृत पाणी योजना सुरु‎ करून त्यावर नळ कनेक्शन द्यावे,‎ अशी मागणी यावेळी महापालिकेचे‎ विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी‎ प्रशासनाकडे केली. मनपाचे विरोधी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पक्षनेते संपत बारस्कर यांच्या‎ नेतृत्वाखाली सावेडी उपनगराच्या‎ पाणी प्रश्नासाठी महापालिकेवर‎ महिलांनी हंडा मोर्चा काढला.‎

यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे,‎ नगरसेविका दीपाली बारस्कर, माजी‎ सभापती कुमारसिंह वाकळे,‎ सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे,‎ नगरसेविका मीनाताई चव्हाण,‎ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बारस्कर, माजी नगरसेवक निखील‎ वारे, बाळासाहेब पवार आदी‎ उपस्थित होते.‎ यावेळी प्रशासनाच्या वतीने‎ अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे,‎ उपायुक्त यशवंत डांगे, पाणी पुरवठा‎ अधिकारी परिमल निकम, इंजिनियर‎ रोहिदास सातपुते यांनी महिलांचे‎ प्रश्न ऐकून घेतले.‎ विरोधी पक्षनेते बारस्कर म्हणाले,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रशासनाच्या उदासीनपणामुळे व‎ काम करण्याची इच्छा नसल्यामुळे‎ वारंवार पाणी पुरवठा विस्कळीत‎ होऊन कमी दाबाने होतो. सावेडी‎ उपनगरामध्ये रहिवासी, नोकरदार‎ वर्ग असल्यामुळे महिलांना विविध‎ प्रश्नांना सामोरे जावे लागते.‎ अक्षरशः नगरसेवकांना‎ नागरिकांच्या वर्षाला सामोरे जावे‎ लागत आहे.‎

अमृतची पाणी योजना‎ ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार‎
अमृत अभियानांतर्गत पाणी पुरवठा‎ योजना ३१ मार्च अखेर पूर्ण होईल.‎ त्यावर कनेक्शनसह पाणी पुरवठा‎ करण्यात येईल. प्रभागातील विविध‎ दुरूस्तीची कामासाठीसाहित्य‎ याबाबत संबंधित ठेकेदाराला‎ वेळेवर साहित्य पुरवण्याबाबत सक्त‎ सूचना दिल्या आहेत, असे उपायुक्त‎ यशवंत डांगे यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...