आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे दुर्लक्ष:मनपाचे स्वच्छ सर्वेक्षण संपताच ॲनिमल वेस्ट पुन्हा रस्त्यावर; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईस मनपाची टाळाटाळ

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील स्वच्छ सर्वेक्षण संपताच कत्तलखाने व हॉटेलमधील ॲनिमल वेस्ट पुन्हा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात झाली आहे. कोठला परिसरासह शहरातील विविध नाल्यांमध्ये ॲनिमल वेस्ट आणून टाकले जात असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे.

मागील काही दिवस स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात विविध उपाययोजना राबवल्या. शहरात जागोजागी टाकला जात असलेला कचरा उचलण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविण्यात आली. मात्र, स्वच्छ सर्वेक्षण संपताच शहरातील कचरा संकलन व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. त्यात शहरातील रस्त्यांवर व नाल्यांमध्ये हॉटेल व कत्तलखान्यामधील वेस्ट आणून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक नाल्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. सततच्या दुर्गंधीमुळे नागरिक व वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले आहेत.

महापालिकेने हॉटेल व कत्तलखान्यामधील वेस्ट संकलन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केलेली आहे. असे असतानाही कत्तलखाने व हॉटेलमधील ॲनिमल वेस्ट जाणीवपूर्वक रस्त्यावर व नाल्यांमध्ये आणून टाकले जात आहे. कोठला परिसरातील प्रमुख रस्त्यावर वारंवार हा प्रकार घडत असतानाही संबंधित परिसरातील हॉटेल चालक व कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास महापालिका टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...