आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात खळबळ:1 मे महाराष्ट्र दिनाला राळेगण सिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची हत्या करणार, अहमदनगरच्या युवकाची धमकी

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 मे महाराष्ट्र दिनाला राळेगण सिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची हत्या करणार असल्याचा इशारा अहमदनगरच्या युवकाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात सुरु असलेल्या शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आला आहे.

या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. तर अण्णा हजारेंच्या समर्थकांमधूनही भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या नागरिकाने रागाच्या भरात इशारा दिला आहे.

संतोष गायधने यांनी म्हटले आहे की, शेतीच्या वादातून संगनमताने आपल्या कुटुंबावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परिवारावर दबाव आणला आहे. कुटुंबावर अनेक खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगतेय, अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे.

या प्रकरणात संतोष गायधने यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही काहीच कारवाई झाली नाही. अखेर या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. तसेच 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जाऊन हत्या करणार, असा इशारा संतोष गायधने यांनी दिला आहे.