आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:अण्णांनी सर्वस्व अर्पण केले,मंत्री पाटलांचे योगदान काय; अनुराधा आदिक यांचा सवाल

श्रीरामपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या माध्यमातील उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई- वडीलांच्या नावे असलेली रक्कम, पत्नी लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने, मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले. त्यांनी भीक मागितली असे बालीश वक्तव्य करण्याऱ्या मंत्री चंद्रकांत दादा यांनी स्वतःचे काय योगदान दिले, याचे आत्मपरीक्षण करावे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केली आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या नेतृत्वाखाली सुनील थोरात, अर्चना पानसरे, दीपक कुऱ्हाडे, बापूसाहेब पटारे, जयंत चौधरी, सोहेल शेख, सुनील मुथा, आदी उपस्थित होते.

आदिक म्हणाल्या, आज महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर दिसतो, त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे तत्वच कारणीभूत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते.

बातम्या आणखी आहेत...