आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पीचा विळखा:सहा दिवसात आणखी 2940 जनावरांना बाधा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंम्पी त्वचा रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत नव्याने २ हजार ९४० जनावरांना लंम्पीची बाधा झाली आहे, याच ६ दिवसात तब्बल २०४ जनावरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांसह पशुसंवर्धन विभागाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात १४ लाखापेक्षा अधिक पशुधन असून दैनंदिन दूध उत्पादन ३२ लाख लिटरपर्यंत आहे.

जिल्ह्यात दूध उत्पादनातून दररोज सुमारे साडेनऊ कोटींची उलाढाल होते. अशा परिस्थितीत लंम्पीचा फैलाव नियंत्रणात येत नसल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. हा रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना तसेच माशा व कीटकांमुळे प्रसारीत होतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांच्या स्थलांतरावर निर्बंध आणून, बाजार बंद केले आहेत. तसेच लसीकरणालाही गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार २२४ जनावरांना लंम्पीची बाधा झाली.

२७ ऑक्टोबरला बाधित जनावरांची संख्या १४ हजार २८४ होती, तर मृत जनावरांचा आकडा ८६९ होता. मंगळवारी १ नोव्हेंबरला पशुसंवर्धन विभागाकडून आलेल्या अहवालानुसार बाधित जनावरांचा आकडा १७ हजार २२४ वर पोहोचला तर मृत जनावरांचा आकडा १ हजार ८३ झाल्याची नोंद आहे. या सहा दिवसातच नव्याने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या २ हजार ९४० तर मृत्यू पावलेल्या जनावरांची संख्या २१४ झाली आहे.

लसीकरण १४ लाख ९७ हजार ६३०
जिल्ह्यात २०८ गावांमधील जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी व्यापक लसीकरण मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली त्यानुसार आतापर्यंत १४ लाख ९७ हजार ६३० जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

दोन हजार जनावरे उपचारानंतर झाली बरी
पशुसंवर्धन विभागामार्फत लंपी रोगाचा फायदा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जात आहेत. बाधित जनावरांना तात्काळ उपचार मिळत असल्याने आतापर्यंत दोन हजार जनावर बरी झाली आहेत. २७ ऑक्टोबरला बऱ्या झालेल्या जनावरांचा आकडा ८ हजार ४८० होता, तर एक नोव्हेंबरला बऱ्या झालेल्या जनावरांचा आकडा १० हजार ४८० वर पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...