आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिपाई पद:मैदानी चाचणीत आणखी 80 उमेदवार झाले बाद

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलिस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीला तिसर्‍या दिवशी शुक्रवारी ६७५ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील ८० उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले तर ५९५ उमेदवारांनी चाचणी दिली. शुक्रवारीही ३२५ उमेदवार गैरहजर राहिले. नगर जिल्ह्यातील पोलिस शिपाई, चालक पदाच्या १३९ जागांसाठी मैदानी चाचणी सुरू आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे स्वत: मैदानी चाचणीसाठी तळ ठोकून आहेत. शुक्रवारी एक हजार मुलांना चाचणीसाठी बोलवले होते. मात्र ३२५ जणांनी मैदानी चाचणीला गैरहजेरी लावली. ६७५ उमेदवार चाचणीसाठी दाखल झाले होते. त्यातील ८० उमेदवार अपात्र ठरले, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...