आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:वनविभागाकडून दुसरा बिबट्याही जेरबंद

अकोले4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निळवंडे धरण परिसरातून शनिवारी (१० डिसेंबर) राजूर वनविभागामार्फत एका बिबट्यास सापळा लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. मात्र वृध्देवरील हल्ल्यातील बिबट्या हा नसल्याची खंत नागरिकांमधुन व्यक्त करण्यात येत असून तो बिबट्या मात्र परिसरातून मोकळाच आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तालुक्यातील विविध गावांतून बिबट्याची दहशत वाढली असून बिबट्याचा दिवसाढवळ्या संचार वाढला आहे. आतापर्यंत या बिबट्याने परिसरातून अनेकांवर प्राणघातक हल्ले केले आहेत.

घरात घुसून हल्ले केल्याच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी राजूर परिसरातील एका बिबट्याला जेरबंद केले. पण २४ डिसेंबरला निळवंडे येथील कोकणेवाडी व परिसरातील खडके वस्तीवर रखमाबाई खडके नामक दिव्यांग वृध्देचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. येथून काही अंतरावरील राजूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला. वनविभागाकडून नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...