आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:अश्लिल व्हिडिओचा आणखी एक प्रकार उघड; 3 कोटींची मागणी करणारे तिघे जेरबंद

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नगर तालुका पोलिसांची कारवाई

शरीर संबंध ठेवत अश्लील व्हिडिओ बनून ब्लॅकमेलिंग करत लाखो रुपयांचा गंडा घालणारे मोठे रॅकेट नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले. त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. याप्रकरणी आरोपीने आणखी एकाला ब्लॅकमेलिंग करत त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नगर तालुक्यातील एका महिलेने शरीरसंबंधाचे अमिष दाखवून एका व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढले. साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाच्या वेळी त्याचे अश्लील व्हिडीओ तयार करून पैशांची मागणी केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. पैसे न दिल्यास व्हिडीओ पोलिसांना दाखवून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील या महिलेने त्याला दिली होती. संबंधित व्यक्तीने नगर तालुका पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. पोलिसांनी तात्काळ महिला व नगर शहरातील कायनेटीक चौकात राहणारा तिचा साथीदार आरोपी अमोल सुरेश मोरे यांना अटक केली. दरम्यान, त्यांनी आणखी कोणाला आपल्या जाळ्यात ओढून असे कृत्य केले आहे का? याची चौकशी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सुरू करताच त्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला.

या महिलेच्या जाळ्यात नगर तालुक्यातील आणखी एक व्यावसायिक अडकला होता. आपल्यासोबत देखील असे घडले असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणातील हमीदपुर येथील आरोपी सचिन भिमराज खेसे याला ताब्यात घेतले. आरोपी खेसे याला खाक्या दाखविताच त्याने हा प्रकार साथीदार जखणगावची ‘ती’ महिला, अमोल सुरेश मोरे, महेश बागले व सागर खरमाळे (दोघे रा. नालेगाव, नगर) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. यातील आरोपी महिला व अमोल मोरे हे दोघे आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर सचिन खेसे याला मंगळवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी बागले व खरमाळे हे मात्र फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

वरीष्ठ अधिकारीच अडकला जाळ्यात
अटक केलेल्या महिला व तिच्या साथीदारांनी आतापर्यंत अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून लाखो रुपये देखील उकळले. शहरातील एक क्लास वन अधिकारी देखील त्यांच्या जाळ्यात अडकला त्याचे अश्लिल व्हिडिओ बनवून त्याच्याकडून तब्बल तीन कोटी रुपयांची मागणी आरोपीने केली. त्यापैकी ८० हजार रुपये या अधिकाऱ्याने आरोपींना दिली असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...