आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:मराठी पत्रकार परिषदेची उत्तर कार्यकारिणी जाहीर ; जिल्हाध्यक्षपदी अमोल वैद्य यांची निवड

शिर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची उत्तर नगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकरिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली. तसेच परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी, मार्गदर्शक, सल्लागार यांच्याही नियुक्ती करण्यात आल्या आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यात लवकरच तालुका पदाधिकारी व कार्यकारिणीच्याही घोषणा करण्यात येणार असून, परिषदेचे जिल्ह्यात अधिकाधिक संघटन वाढीसाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

प्रदेश प्रतिनिधी : सुनिल नवले - (संगमनेर), मार्गदर्शक - प्रकाश टाकळकर (अकोले), विकास अंत्रे (श्रीरामपूर), अशोक गाडेकर (श्रीरामपूर), नवनाथ दिघे (शिर्डी), गुरुप्रसाद देशपांडे (नेवासा), बाळासाहेब भांड, (श्रीरामपूर), प्रमोद आहेर (शिर्डी), संदीप वाकचौरे (संगमनेर), सल्लागार - गौतम गायकवाड (संगमनेर), राजेंद्र उंडे (देवळाली प्रवरा, राहुरी), विद्याचंद्र सातपुते. अध्यक्ष - अमोल वैद्य (अकोले). उपाध्यक्ष - दिलीप खरात (राहाता), रवि भागवत (श्रीरामपूर), सरचिटणीस रोहित टेके (कोपरगाव), सहसरचिटणीस - दिलीप शिंदे (नेवासा), खजिनदार - रियाज देशमुख (राहुरी), संपर्क प्रमुख - महेश माळवे (श्रीरामपूर), प्रसिद्धी प्रमुख - प्रकाश आरोटे (गावकरी), कार्यकारिणी सदस्य राजु पठाण (राहाता), सचिन जंत्रे (संगमनेर), राजू जाधव (अकोले), अनंत बर्गे (कोपरगाव), आकाश येवले (राहुरी), सोमनाथ कचरे (कुकाणा, नेवासा). नूतन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...