आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:अनुदानासाठी मदरशांनी अर्ज करण्याचे आवाहन

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी इच्छुक मदरशांनी ३० ऑगस्टपर्यंत जिल्हा नियोजन समिती येथे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांनी केले. या योजनेतून मदरशांच्या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी, पेयजल व्यवस्था, प्रसाधनगृह उभारणे, डागडुजी करणे, विद्यार्थ्यासाठी आवश्यक फर्निचर, मदरसांच्या निवासस्थानात इनव्हर्टरची सुविधा, मदरसांच्या इमारतीचे नुतनीकरण यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.